अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे


महाराष्ट्र शासनआदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्व विचारात घेऊन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना देखील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे सोपे व्हावे तसेच त्यांना इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात आणणे या करीता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे ही योजना दि. २८/८/२००९ रोजी च्या शासन निर्णयान्वये सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित.

योजनेच्या अटी व शर्ती

• विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.

• वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु. १ लाख.

योजनेची व्याप्ती व प्रगती:

• योजनेंतर्गत इयत्ता १ ली व २ री च्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो व १२ वी पर्यंत शिक्षण देण्याची तरतूद

• शाळा निवडीकरीता प्रधान सचिवआदिवासी विकास, (अध्यक्ष) आणि प्रधान सचिववित्त व शालेय शिक्षण (सदस्य) त्रिसदस्यीय समिती आहे.

योजनेंतर्गत सुरूवातीस सन २०१४-१५ पर्यंत विद्यार्थी निवडीचा लाक्षांक २५०० इतका होता.

• तथापि तत्कालीन मा. मुख्यमंत्री महोदयांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार दि. २१/४/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये लक्षांक दहापटीने वाढवून तो २५000 करण्यात आला.

• सन २०१६-१७ पासून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले.

• पुढे दि. १८/५/२०१८ रोजीच्या शासन निणयान्वये शाळा निवडीकरीता सुधारीत निकष निर्गमित करण्यात आले. यामध्ये शाळेतील भौतिक सोयी सुविधा शिक्षकांचा दर्जाशाळेची

शैक्षणिक प्रगतीस्वच्छता व सुरक्षितता इत्यादी सर्वंकष निकषांचा समावेश करण्यात आला. या निकषांच्या आधारे शाळांचे गुणांकन करण्यात येते.

• यामध्ये बिगर नामांकित तसेच नामांकित योजनेंतर्गत प्रवेशित विद्यार्थी यांचे प्रमाण पन्नास पन्नास टक्के असणे अनिवार्य केले.

तिकार शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुष उपाययोजना फ्रजमध्ये ठेवलेले व पचायला जड पदार्थ टाळणे हितकारक आहेशंत तागाचा शेत गार्क टाल देनेदमी फायदेशीर आहे

Related Posts

Post a Comment

Recent Posts

Subscribe Our Newsletter